Header Ads Widget

धक्कादायक! एसटी बसमध्ये वृद्धेच्या महिलेच्या गळ्यातून ५० हजारांची सोन्याची पोत खेचून चोरी; नरडाणा पोलिसांची 'सुपरफास्ट' अटक, काही तासांतच ऐवज जप्त!

नरडाणा:-- नरडाणा पोलीस स्टेशनने 'ॲक्शन मोड'मध्ये गुन्हेगारीवर जेरबंदी सुरू केली असून, एसटी बसमधील भयानक चोरीचा गुन्हा फक्त काही तासांत उघडकीस आणला. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ११.४५ वाजता नरडाणा बसस्थानकावरून शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढलेल्या ७१ वर्षीय वृद्ध महिला कुसुम राजाराम पाटील (रा. हुंबर्डे, ता. शिंदखेडा) यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याची पोत (५०,००० रुपये किंमत) एका अनोळखी महिलेच्या हातून खेचून चोरली गेली
 �. फिर्यादीच्या वर्णनावरून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत गावातून आरोपी महिलेला अटक केली; चौकशीत गुन्हा कबूल झाल्यावर पोत हस्तगत करून गुन्हा नस्तंभित केला
 �.दुसरी मोठी कारवाई: नरडाणा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी होळ शिवारातील अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करून विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली. या सततच्या यशस्वी मोहिमांमुळे गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांमध्ये दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे 
�.कारवाई करणारे पथक: ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पीआय निलेश मोरे, पीएसआय रविंद्र महाले, विजय आहेर यांच्या नेतृत्वात असई हेमंत पाटील, पोहेकॉ राकेश शिरसाठ, ललीत पाटील, भरत चव्हाण, योगेश गिते, अनारसिंग पवार, विक्रांत देसले, पोना भुरा पाटील, पोकों विजय माळी, अर्पण मोरे, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनवणे, मपोकों भारती भोसले, अनिता पवार, चाग्रेपोसई अजय सोनवणे, पोहेकॉ सुनील पगारे, होम जितेंद्र रणदिवे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment

0 Comments