Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न

सुजाण नागरिक प्रतिनिधी सा.श्री सी जी वारूडे 
       शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब श्री एस ए कदम सर यांनी "सामाजिक समतेचा" संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वंतत्र मिळवून देणारे "क्रांतीसुर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       त्यानंतर विद्यार्थी -विद्यार्थीनींनी ओव्या भाषणं केली नंतर विद्यालयातील शिक्षक श्री.सी.जी.वारूडे, श्री.एस.बी.भदाणे, श्री.पी.आर.पाटील आदिनीं ज्योतिबा फुलेंविषयी मनोगत व्यक्त केले
          शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुन या गावी झाला व मृत्यू २८/११/१८९० साली झाला होता.
      महात्मा ज्योतिबा फुले (अवघ्या ६३ वर्ष काळापर्यंतच्या जीवन प्रवासात) त्यांनी शिक्षण व अभ्यासक्रम प्रकट होणारे विचार -स्वातंत्र्य,समता, आणि बंधुता,या त्रयीवर(त्रिवर्ग) नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवणारे म.फुले हे महापुरुष होते.तर त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जातात ते मानवतावादी विचारांचे होते  त्यांनी मेकाॅलच्या खलित्यास कडाडून विरोध "शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत बाजारात आले पाहिजे" या विचारास महात्मा ज्योतिराव फुले यांचा विरोध होता कारण इंग्रजांचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता.परंतु म.फुले म्हणाले होते की, प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण द्यावे.'आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस'अश्या पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर आग्रह होता,"प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण हे सूत्र अंमलात आणावे यावर त्याकाळी भर देण्यात आला. 
*महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक विचार*
*स्री शिक्षणाचा पाठपुरावा
*प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत
*प्रशिक्षित शिक्षकाची तरतूद करणे 
*प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे 
*ग्रामीण भागातील मुला-मुलींचे शिक्षण 
*राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण 
*शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल विचार 
*व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण.
विद्येविना मती गेली|
मतीविना नीती गेली|
नीतीविना गती गेली|
गतीविना वित्त गेले|
वित्ताविना शुद्र खचले|
इतके अनर्थ एका अविद्येने केले||
      इ.विषयीचे महत्त्व पटवून देत स्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह,जातीय सलोखा, अस्पृश्यता निवारण, शेतकऱ्यांचेहित अशा अनेक गोष्टींसाठी विरोध सहन करत लढत राहिले व त्यांच्या पत्नीस प्रथमतः शिक्षणाचे धडे दिले(शिकवलेली आई घरादाराला पुढे नेईल!)म्हणून सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, सरोजिनी नायडू,मदर तेरेसा, सुनिता विल्यम्स,कल्पना चावला, किरण बेदी, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सिंधूताई सपकाळ,वगैरे शास्त्रज्ञ व वैज्ञानिक, साहित्य शेतकऱ्यांचे आसूड ,सत्यशोधक ,७/१२पध्दत, पाणी आडवा पाणी जिरवा इ.दाखले देत महात्मा ज्योतिराव फुलें यांच्या जीवनाशैली विषयीचे महत्त्व पटवून दिलेत.
         यावेळी कार्यक्रमास मा.मुख्याध्यापक,
शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन-श्री आर बी गवळे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments