धुळे- महानगर राष्ट्र सेवा दल आणि शिक्षक भारती तर्फे, मराठवाड्यातील, पुरग्रस्त भागातील आपतग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना, सुमारे एक लाख रूपयांचे, शैक्षणिक साहित्य वाटपासाठी, धुळे येथुन, दि. २८/११/२०२५ रोजी, सायंकाळी सहा वाजेच्या, धुळे-सोलापुर एसटी बस ने, ज्येष्ठ साथी- अनिल देवपुरकर आणि साथी रामदास जगताप हे रवाना झाले आहेत. ते मोहोळ येथे उतरून, तेथील साथींच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहेत. शैक्षणिक साहित्यासह अनिल देवपुरकर आणि रामदास जगताप हे रवाना होते वेळी, धुळे बस स्थानकावर, महानगर अध्यक्ष महेश बोरसे, ज्येष्ठ साथी रमेश पवार, संघटक भैय्या पाटील, दत्ताजी बागुल, गो. पि. लांडगे, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे, राज्य संघटक सचिव अश्पाक खाटीक, यतिन पाटील, विवेक खैरनार, नितिन जगताप, उपस्थित होते. यावेळी बसचे वाहक अरविंद वाघ, चालक बापु शिरसाठ यांनी योग्य ते सहकार्य केले.
****
0 Comments