Header Ads Widget

शिंदखेड्यात कलावती माळींचा धमाकेदार प्रवेश! नगराध्यक्षपदभार स्वीकारत राजकीय मैदानात धडाकेबाज एंट्री


शिंदखेडा नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती कलावती माळी यांनी स्वीकारला आज पदभार प्रसंगी नगरपंचायतीचे सीईओ श्रीकांत फागणेकर यांनी केले स्वागत 
    शिंदखेडा प्रतिनिधी येथील नगरपंचायत निवडणूक मतदान व निकाल जाहीर झाल्यानंतर आज दिनांक 26 डिसेंबर रोजी नवनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती कलावती माळी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला प्रसंगी निवडून आलेल्या नगरसेवक सौ पुष्पाताई सोनवणे सौ रजूबाई माळी नगरसेवक गणेश भील यांची उपस्थिती होती नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यावर नगरपंचायतीचे सीईओ श्रीकांत फागणेकर यांनी प्रशस्त बुके देऊन नगरपंचायतीच्या वतीने स्वागत केले 
     प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रतोद श्यामभाऊ सनेर सोबत माजी आमदार रामकृष्ण पाटील सुभाष माळी गणेश खलाणे प्रकाश नाना चौधरी दोंडाईचा येथील बापू माळी गावातील प्रतिष्ठित रमेश माळी नगरपंचायतीचे विद्यमान गटनेते राकेश माळी यांची विशेष उपस्थिती होती यासह गावातील शेकडो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते
     कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रतोद श्यामभाऊ सनेर यांनी आपल्या मनोगतात म्हटले शिंदखेडाचा विकास सुंदर शहर स्वच्छ शहर असा संकल्प प्रत्येक वार्ड व विभागात लोकोपयोगी कामे मोठ्या प्रमाणावरती केली जातील असे आश्वासन दिले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपणास कुठलाही विकास कामांचा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे असे ते म्हणाले माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनीही आपण सर्व मिळून कोणताही भेदभाव मनाशी न ठेवता सार्वजनिक कामे करणार यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित अशा भावना व्यक्त केल्या 
     व्हॉइस ऑफ मेडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी आपल्या मनोगतात नवीन वसाहतीत अर्थात कॉलनी एरियात अनेक समस्या आहेत त्यात बीके देसले नगर लाईन क्रमांक तीन अनेक समस्या ग्रस्त विभाग असल्याने या भागाकडे अधिक लक्ष द्यावे व सार्वजनिक कामांना प्राधान्य द्यावे अशा प्रकारचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक माळी यांनी केले नवनियुक्त व लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती कलावती माळी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना म्हटले की उपस्थित सर्व पत्रकार वार्ताहर यांचेही त्यांनी आभार मानले पत्रकार भूषण पवार यांनी प्रसंगी वार्ताहरांचे  आभार मानल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले त्यानंतर कचेरी चौकातील परिसर जो अस्वच्छ आहे तो स्वच्छ करण्याची पाहणी करण्यात आली व सुंदर शहर स्वच्छ शहर असा संकल्प विजयी झालेल्या उमेदवार नगराध्यक्ष यांनी केला विशेष परिश्रम मनीष माळी राहुल गोपाळराव सोनवणे पाटील निलेश निकम पाटील यांनी घेतले

Post a Comment

0 Comments