Header Ads Widget

जळगावात धारदार शस्त्राने तरुणाची निघृण हत्या; परिसरात तणाव.




जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असून सागर साहेबराव सोनवणे (वय अंदाजे …) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी सागर सोनवणे याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. डोक्यात गंभीर वार केल्यानंतर त्याला निमखेडी गावातील राम मंदिराजवळ गंभीर जखमी अवस्थेत टाकून दिल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने सागरला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मृत सागर सोनवणे याच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक तपास सुरू आहे.

या खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments