धुळे- समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे राष्ट्र सेवा दल वाढीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सेवा दल सैनिकांची आहे राष्ट्र सेवा दल वाढ हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांनी व्यक्त केले.
आणीबाणी च्या काळात भूमिगत राहून कार्यकर्त्यांना दिलेले बळ, शेतकरी, शेतमजूर, वंचित, दुर्बल घटकांसाठी दिलेला लढा तसेच आयुष्याच्या शेवट पर्यंत आपलं घर साठी दिलेले योगदान हे न विसरता येणारे सारखे आहे. धुळे महानगर राष्ट्र सेवा दलातर्फे साथी पन्नालाल सुराणा यांना मातृ सेवा संघाच्या साप्ताहिक शाखेत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, ते बोलत होते. यावेळी, ज्येष्ठ साथी गुरव माधव, शरद कांबळे, सुरेश थोरात, प्रा शाम पाटील, प्रा. भगवान पाटील, अविनाश पाटील, प्रा विलास चव्हाण, यांनी, पन्नालालभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊ हे, राष्ट्र सेवा दलाचे पितामह होते. त्यांनी, भारत भर बस ने प्रवास करीत, समाजवादाचा प्रचार व प्रसार केला. अगणित लोकांना, पोस्टकार्ड पत्र पाठवून, समाजवादी विचार जिवंत ठेवला. यावेळी,- ज्येष्ठ साथी गो. पि. लांडगे, रमेश पाकड, रमेश पवार, अध्यक्ष महेश बोरसे, संघटक रामदास जगताप, नितीन माने, रमेश सावंत, दत्ता बागुल, यतिन पाटील, गोकुळ राजपूत, महेंद्र शिरपूरकर, भास्करबापु पाटील, अश्पाक खाटीक, साखरलाल देसले, बाल साथी- राहील खाटीक, कु. स्वरा थोरात, रूपेश पाटील हे उपस्थित होते.
0 Comments