Header Ads Widget

कष्ट, जिद्द आणि शिक्षणाप्रती निष्ठेचा सन्मान; पाष्टे गावाचा अभिमान वाढवणारी कामगिरी “शिक्षण सेवेचा गौरव : सावळदेचे मुख्याध्यापक सी. जी. पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान”


शिरपूर : शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे सावळदे येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. जी. पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे सावळदे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“एकांत वासाचा अधिकार हा संवैधानिक अधिकार” या विषयावर त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. दीर्घ परिश्रम, अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी ही शैक्षणिक शिखर गाठली. दिनांक ११ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
या संशोधनासाठी धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ येथील प्रा. डॉ. साजिदा जे. शेख यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मन्यार लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी, धुळे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार बहिरम, नंदुरबार लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी आणि डॉ. विजेता सिंग यांचे सहकार्य लाभले.
सी. जी. पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल , उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, विजय भंडारी, विजय अग्रवाल, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा तसेच अकॅडमी इन्चार्ज पी. व्ही. पाटील यांनी त्यांचे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा दीप प्रज्वलित झाला असून, शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

Post a Comment

0 Comments