नरडाणा मंडळाच्या पुढाकारातून विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग – गावोगावी जाऊन योजनांची माहिती
नरडाणा (ता. शिंदखेडा) – मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या आदेशाने, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच तहसीलदार शिंदखेडा नितीनकुमार देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ भाग नरडाणा येथे दि. 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता मौजे पाष्टे येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती व प्रचार-प्रसारासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा तसेच योजनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून माहिती देता यावी, या उद्देशाने पथनाट्य हा प्रभावी पर्याय ठरला.
या संकल्पनेतून नरडाणा येथील मंडळ अधिकारी स्वाती वाघ व नरडाणा मंडळ टीम यांच्या सौजन्याने विकास विद्यालय, नरडाणा येथील विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्य तयार करण्यात आले. या जनजागृती पथनाट्याचा उद्घाटन सोहळा दि. 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला.
यानंतर नरडाणा, वारूळ, पाष्टे या शिवारात तसेच विविध गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर करून नागरिकांना शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.
या पथनाट्यात मंडळ अधिकारी स्वाती वाघ, ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल मोरे (नरडाणा), महेंद्र पाटील (जातोडा), मोनाली पवार (माळीच), योगेश ठाकरे (पाष्टे), रत्ना राजपूत (नरडाणा-२), गोविंदा माळी (वारूड) यांनी विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पाष्टे गावाचे सरपंच मोतीलाल नामदेव वाकडे (मोती नाना) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विकास विद्यालयाचे शिक्षक-विद्यार्थी, महसूल मंडळ नरडाणा टीम, जितेंद्र सोनवणे, अमृत शिंदे, संपत आखाडे, कोतवाल माळीच, किशोर ठाकरे तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रभावी जनजागृती झाल्याने पंचक्रोशीत आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पथनाट्याची सांगता करण्यात आली.
0 Comments