Header Ads Widget

*कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन; डॉ. संदीप निरंजन वेंदे यांना पीएच.डी. पदवी*

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
 अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दोंडाईचा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप निरंजन वेंदे  यांना “AI-Driven Analysis of Social Media Data for Enhancing Public Health Insights” या विषयावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

सामाजिक माध्यमांवरील माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने विश्लेषण करून सार्वजनिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती आणि प्रवृत्ती शोधण्याबाबत त्यांनी हे संशोधन पूर्ण केले आहे.

या यशाबद्दल अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष श्री. राजेशजी मुनोत, संचालक सौरभ मुनोत तसेच डॉ. एन. एस. पाटील, श्री दिनेश बाविस्कर  यांनी डॉ. संदीप निरंजन वेंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments