Header Ads Widget

बेटावद येथे पाणीपुरवठा करणारी विहिरीत शॉर्ट-सर्किटमुळे माशांचा मृत्यू.


बेटावद प्रतिनिधी.
बेटावद ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीत  शॉर्ट-सर्किट झाल्याने विहिरीतील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे मृत माशांमुळे विहिरीतील पाणी दूषित झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावाचा पाणीपुरवठा त्या विहिरी वरून बंद केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा विहिरीचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट-सर्किट झाले यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून माशांचा मृत्यू झाला नळाला दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले
      जोपर्यंत विहीर आणि जॅकवेलचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत गावाला पाणीपुरवठा उशिराने होईल गावात सध्या दोन विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जात होता आता एकाच विहिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे 
 ग्रामस्थांनी नळांना तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे

शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपणार कधी?
 पाणीपुरवठा विहिरीत मासे मरून पडल्याने सध्या गावाला दूषित पाण्याचा सामना करावा लागला आहे 
बेटावद गावासाठी शुद्ध पेयजल योजना मंजूर झाली आहे मात्र, ही योजना अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने ग्रामस्थांना विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे
ग्रामस्थांची मागणी: आम्हाला केवळ पाणी नको, तर शुद्ध आणि फिल्टर केलेले पाणी हवे आहे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

त्यामुळे प्रशासनाने मंजूर असलेली शुद्ध पाणी पुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करावी, जेणेकरून बेटावदकरांना कायमस्वरूपी शुद्ध आणि फिल्टर केलेले पाणी मिळू शकेल.

Post a Comment

0 Comments