Header Ads Widget

*बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत आहेत आजार : डॉ. सोहनलाल पारख*

पारख हाॅस्पिटलच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त व रोटरी सिनियर्सतर्फे मोफत यकृत तपासणी शिबिर पारख हाॅस्पिटल येथे दि.१३/३/२६ रोजी सकाळी घेण्यात येऊन या शिबिरात शंभरहून अधिक पेंशट यांच्यी तपासणी करण्यात आली 
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी तसेच पचनसंस्थेचे विकार यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे मत हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सोहनलाल पारख यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स आणि पारख हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पारख हॉस्पिटलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्टेशन भागातील पारख हॉस्पिटल येथे मोफत यकृत रोग (Liver Forever) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात प्रगत फायब्रोस्कॅन मशीनद्वारे यकृत तपासणी शंभर पेंशटची झायडस या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीचे तंत्रज्ञ विजय निकुंभ यांनी तपासणी केली.
तपासणीनंतर रुग्णांना आढळलेल्या त्रुटींवर उपाययोजना करण्यासाठी डॉ. सोहनलाल पारख व डॉ. सचिन पारख यांनी विनामूल्य मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक रुग्णांमध्ये टाईप-२ मधुमेह, लठ्ठपणा, ट्रायग्लिसराईड्सची वाढलेली पातळी, कोलेस्ट्रॉलची जास्तीची पातळी तसेच अन्नपचनाचे विकार आढळून येतात. अशा रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून योग्य सल्ला देण्यात आला. 
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे तंत्रज्ञ तसेच पारख हॉस्पिटलचे कर्मचारी कु.हर्षदा भोई सौ सिमा मालचे श्रीमती विद्या हजारे कु.श्रेजल गिरासे श्री विरेंद्र गिरासे आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments