शिंदखेडा(वा.)-तहसील प्रशासन व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेड्याच्या वतीने 15 मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
या निमित्त जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन शिंदखेडा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
येथील तहसील कार्यालयात या दिनाच्या नियोजनाबाबत तहसीलदार नितीन देवरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्य कार्यकारीणी सदस्य व जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा, तालुकाध्यक्ष माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, सचिव अशोक राखेचा ,ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य जितेंद्र मेखे, माजी संघटिका छाया पवार यासह तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदावर पुरवठा, लिपिक कार्तिकी मराठे,चैताली शिंदे, अव्वल कारकून एन.एस.माळी व रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ही निबंध स्पर्धा शिंदखेडा शहरातील सर्व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असून जागतिक दिनाचे महत्त्व,फसव्या जाहिराती आणि ग्राहकाची फसवणूक, बिल घ्याफसवणूक टाळा या तीन विषयावर असून, विद्यार्थ्यांनी यापैकी कोणतेही एका विषयावर चारशे ते पाचशे शब्द मर्यादापर्यंत कागदाच्या एका बाजूस स्पष्ट अक्षरात स्व हस्तान लिहलेला असावा.निबंध लिहून त्यावर एक स्वतंत्र पानावर आपले पूर्ण नाव, पत्ता विद्यालयाचे नाव, मोबाईल नंबर आदि लिहावा.आप.आपपले निबंध आपापल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य किंवा नियुक्त केलेल्या शिक्षकांपर्यंत दिनांक 16 मार्च 2026 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत जमा करावे. तसेच तहसील कार्यालयात दिनांक 17 मार्च 2016 रोजी सकाळी आठ वाजता ग्राहक जागृती पर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या दोन्ही स्पर्धेत स्वतंत्र प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला अनुक्रमे 1501 रुपये 1001 रुपये 701 रुपये ची रोख परितोषिक तहसील कार्यालय शिंदखेडा मार्फत शिंदखेडा तहसील कार्यालयात आयोजित 17 मार्च 2016 रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी 11 वाजता देण्यात येतील. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधीकारी सुभाष बोरकर, प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक, तहसीलदार नितीन देवरे, जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नीता देसाई, ग्राहक पंचायतचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. चंद्रकांत डागा,विभागीय अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष ॲड.जे टी देसले, तालुका अध्यक्ष प्रा.प्रदीप दीक्षित व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्राहक संरक्षण परिषदेची शासकीय व शासकीय सदस्य उपस्थित राहणार आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन तहसील प्रशासन व ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा व तालुका शाखेने केले आहे.
0 Comments