Header Ads Widget

लामकानीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर संपन्न....मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे


महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ 
 तहसीलदार कार्यालय धुळे ग्रामीण तसेच महसुल मंडळ  अधिकारी कार्यालय लामकानी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरती देवरे ,तहसीदार धुळे ग्रामीण अरूण शेवाळे, नायब तहसीलदार देवेंद्र येवले , रविंद्र मगर, तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षा महाजन, माजी पंचायत सदस्य बी.सी.महाले,तुषार महाले, माजी उपसरपंच बाजीराव महाले,किशोर चौधरी,नरहर येवले,सैताळे माजी सरपंच बापु पाटील, चिंचवार सरपंच रहिम पटेल, रामी माजी सरपंच दिलीप गिरासे, रोहिदास माळी, छोटु माळी,मंडळ अधिकारी लामकानी दिलीप चौधरी, ग्राम महसूल अधिकारी राहुल सोनवणे, अंकुश भैरट, विशाल कदम, भूषण चौधरी, कृष्णा पवार, भाग्यश्री बोरसे व महसूल सेवक नरेश माळी, राधिका वाडिले, उषा कर्वे,धनश्री बागुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी आय .चव्हाण, डॉ. बी.झेड ठाकूर,तसेच मंडळातील गावाचे सरपंच, उपसरपंच  अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका उपस्थित होते.
 या शिबिरात विविध दाखले वाटप करण्यात आले, त्यात ६६ दुय्यम शिधापत्रिका १५उत्पन्न दाखले १२८ अधिवास प्रमाणपत्रे ,जिवंत ७/१२ दुरुस्ती १८ व डिजिटल २७५ डिजिटल८अ १७५ ,विशेष सहाय्य योजना १४, ७/१२नावात दुरुस्ती ,वारस नोंदी, भोगवटदार वर्ग -२ मधून वर्ग-१ करणे,इत्यादी दाखले यावेळी वाटप करण्यातआले. 
या अभियानांतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार देवेंद्र येवले यांनी केले तर  सूत्रसंचालन प्रशांत पाकळे  यांनी केले,या समाधान शिबिरास लामकानी आणि परिसरातील गावांतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला.

Post a Comment

0 Comments