बेटावद प्रतिनीधी
जिल्हा हिवताप अधिकारी धुळे, तालुका आरोग्य अधिकारी शिंदखेडा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद यांच्या मार्गदर्शनाखाली मुडावद उपकेंद्र परिसरात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यात आले
दि. १४ मार्च २०२६ रोजी मुडावद उपकेंद्रांतर्गत मुडावद आणि भिलाने गावांमध्ये विशेष आरोग्य मोहीम राबवण्यात आली यामध्ये मा जिल्हा हिवताप अधिकारी धुळे, तालुका आरोग्य अधिकारी शिंदखेडा, वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र बेटावद यांच्या आदेशान्वये उपकेंद्र मुडावद गावात कंटेनर सर्वे करून अबेटिंग करण्यात आली
तसेच संशयित डेंग्यू रुग्णाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाची आरोग्य तपासणी केली संबंधित रुग्णास पुढील उपचारासाठी हिरे रुग्णालय, धुळे येथे रेफर करण्यात आले
समुदाय आरोग्य अधिकारी योगेश मोरे यांनी जलद ताप सर्वे व तपासणी केली
व किरकोळ आजारी रुग्णांची तपासणी व त्यांना जागेवरच औषधोपचार देण्यात आले डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या टीमने संपूर्ण गावात धूर फवारण केली
या मोहिमेदरम्यान आरोग्य सेवक आर. आर. बहुरे, आरोग्य सेवक पी. व्ही. पाटील, स्थानिक सरपंच आणि आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली घराभोवती पाणी साचू न देणे, कोरडा दिवस पाळणे आणि डासांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments