Header Ads Widget

“विद्यार्थी चळवळीपासून समाजसेवेपर्यंतचा प्रवास… माजी नगरसेवक दिपक भाऊ चौधरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव”


विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणारे, गरजूंच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे लढवय्ये व्यक्तिमत्त्व
शिंदखेडा : विद्यार्थी जीवनापासून समाजकारणाची वाट निवडून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तसेच गरजू व संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देणारे माजी नगरसेवक दिपक भाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस विविध स्तरातून शुभेच्छा देत साजरा करण्यात येत आहे.
कॉलेज जीवनापासूनच मित्रमंडळीसोबत सामाजिक व विद्यार्थी हिताच्या प्रश्नांसाठी काम करण्याची परंपरा त्यांनी जपली. पक्ष व विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी विद्यार्थी आणि शहराच्या नागरिकांच्या हितालाच प्राधान्य देत त्यांनी नेहमीच एकत्रितपणे कार्य केले.
कवि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ए.टी.के.टी. परीक्षेसाठी शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांना शिरपूरला जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येविरोधात दिपक भाऊ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९९ साली जळगाव येथे विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा काढला होता. या आंदोलनाला यश मिळाले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
याशिवाय शहरातील विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम तसेच शासकीय कामकाजात नागरिकांना मदत करणे, गरजू रुग्णांना आधार देणे अशा अनेक क्षेत्रांत ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच शहरात विश्वासू, लढवय्ये आणि मदतीला तत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
“आई तुळजा भवानीच्या कृपेने त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो,” अशी प्रार्थना संपादक सुजान नागरिक नरडाणा तसेच व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघांचे शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे पदाधिकारी व सदस्य मंडळ व मित्रपरिवाराकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments