-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
शिंदखेडा प्रदीप दीक्षित - नाशिक ट्राफिक पोलिसांचा अजब कारभार जबाबदार कोण चौकशी व्हावी अशी मागणी होतं आहे
सविस्तर माहिती आशी कि दिनांक 10-03-2026 रोजी माझ्या मोबाईल नंबर वर रु 1500 चे चलन मेसेज प्राप्त झाला सदर चलन ट्रॅफिक पोलीस नाशिक यांच्यातर्फे आल्याचे निष्पन्न झाले ऑनलाईन चौकशी केली असता त्यात नमूद केले ते असे विदाउट हेल्मेट रु 1000 + 500 फ्लाय ओव्हर पुलाबाबत असे एकूण रु 1500 भरावे असे निर्देशीत केले असून सदर चलन तारीख 08-08=2023 असेही नमूद केले आहे मला प्रश्न असा पडला कि माझी तर कार आहे जिचा नंबर MH-15 JH 7561 असा आहे सदर टाटा कंपनीची टिगोर कार 07-09-2023 रोजी घेतली आहे प्रश्न असाही आहे कि कार ड्रायव्हिंगसाठी हेल्मेटचा वापर कधीपासून सुरु झाला!!?? हा पण महत्वाचा प्रश्न आहे ऑनलाईन प्रत काढली असता त्यावर अरुण फकीरा भोसले पीएसआय असे नावं व हुद्दा दिसून आला
ऑनलाईन माहितीत असलेल्या गाडी मालकाचा फोटो माझा नसून दुसऱ्याचाच आहे तर फोटो बाईकचा असून त्यावरील व्हेइकलं नंबर
MH 15-जेई 7561 हा आहे हे सारे असतांना ट्रॅफिक विभागाने जबाबदारीने चलन पाठवताना माझ्या कारची आर सी बुकवरील माहिती नमूद केलेली आहे ट्रॅफिक पोलीस जर अशी गंभीर चूक करीत असतील तर वाहन धारकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो या बाबत चौकशी झाली पाहिजे व या अक्षम्य चुकीबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली पाहिजे उगाचच वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागतो कृपया महाराष्ट्र राज्याच्या ट्रॅफिक कार्यालयाने याची दखल घेऊन MH -15- JH 7561 या वाहनावर दर्शविण्यात आलेले अजब कारभारचे गजब असे दंडात्मक चलन रद्द करावे अशी मागणी अंतर राष्ट्रीय व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघांचे शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे अध्यक्ष प्रा प्रदीप दीक्षित यांनी केली आहे यावरून असे म्हणावे कां ट्रॅफिक पोलीस योग्य दखल घेत नसावे काय बाईकचा व्हेइकलं नंबरची खात्री न करता कार चालकावर कार्यवाही झाली असावी काय हाही मोठा प्रश्न आहे
0 Comments