धुळे (प्रतिनिधी): धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत (२०२६–२०२९) शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे गावाच्या सौ. भावनाताई सनेर यांनी ऐतिहासिक कामगिरी करत जिल्ह्यातील पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून निवड मिळवली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पाष्टे गावासह संपूर्ण शिंदखेडा तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर गाजले आहे.
या निवडणुकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून शिंदखेडा तालुक्यातून चार सदस्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये श्री. संजयसेठ जैन (दोंडाईचा), श्री. आशिष अग्रवाल (दोंडाईचा), श्री. जितेंद्र गिरासे (शिंदखेडा) आणि श्री. मिलिंद पाटील (शिंदखेडा) यांचा समावेश आहे.
तसेच शिंदखेडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी श्री. हुकूमचंद जैन (वारुळ-नरडाणा) यांची निवड झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राज्य कार्यकारिणीच्या महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात महिला केमिस्ट सदस्यांचा समावेश असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शिंदखेडा तालुक्याला प्रथम मान मिळत सौ. भावनाताई सनेर यांची जिल्हा विशेष निमंत्रित महिला कार्यकारिणी सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांनी एकजुटीने काम करत शिंदखेडा तालुक्याचे नाव जिल्हा, सेंट्रल झोन तसेच राज्य पातळीवर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन कार्यकारिणी मार्फत तालुका एकसंध ठेवत विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सौ. भावनाताई सनेर यांनी सरचिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा
शुभेच्छुक-- भालचंद्र पाटील
संपादक सा सुजान नागरिक पाष्टे
0 Comments