Header Ads Widget

शिंदखेडा तालुक्यात राजकीय उलथापालथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाश चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश

शिंदखेडा प्रतिनिधि _तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. विशेष म्हणजे, हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त
 झाले.प्रकाश चौधरी यांच्यासोबत माजी सैनिक भुषण पवार, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, मुरलीधर माळी, देवाराम चौधरी, गुलजारसिंह गिरासे, राजेंद्र बडगुजर, जितेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, सचिन चौधरी आणि सागर बडगुजर यांचाही शिंदे गटात समावेश झाला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना प्रकाश नाना चौधरी म्हणाले की, “समाजासाठी अधिक प्रभावी आणि व्यापक काम करण्याच्या उद्देशाने आम्ही शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करून विकासाला गती देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”दरम्यान, धुळे येथील माजी महापौर भगवान बापू करंकाळ यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाध्यक्ष मनोज दादा मोरे तसेच शिंदखेडा शहराध्यक्ष सोनू वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या घडामोडींमुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments