Header Ads Widget

*शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील शिबिरात ५० रक्त बॅग संकलित* 👉 *जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून उपक्रम*

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात ५० रक्त बॅग संकलित करण्यात आल्या. जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अधीक्षक डॉ. अजित पाठक, डॉ. स्वाती राजपूत, डॉ. विशेष सैनी, मिलिंद धात्रक, खंडू ईशी, गणेश माळवे आदी उपस्थित होते. डॉ. सोनवणे म्हणाले की, रक्तदान हे महत्वाचे कार्य आहे. रक्तदानामुळे कुणाचा तरी आपण जीव वाचवू शकतो. एक सुदृढ व्यक्ती तीन महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो. रक्तदानापूर्वी वैद्यकीय सल्ला महत्वाचा असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखी खालीच रक्तदान करावे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांनी रुग्णालय व परिसराची पाहणी केली.
या शिबिरासाठी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय पवार, डेटा ऑपरेटर पंकज पाटील आणि रुग्णवाहिका (१०२) चालक मुकेश पाटोळे यांनी, तर रक्तसंकलनासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. सुनील चव्हाण, अक्षय लंकेवाड, अरुण चौधरी, अंकुश राठोड, जितेंद्र चौधरी, अर्पिता धात्रक आणि जॉली पाटील यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments