Header Ads Widget

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीउत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बन्सीलाल अण्णा भागवत

अमळनेर- धनगर समाजाचे लढवय्ये नेते अभ्यासू वक्ते, अण्णासाहेब बन्सीलाल भागवत सर यांच्या समर्थ खाद्यांवर उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली असून धनगर समाज महासंघात त्यांच्या सुयोग्य निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. अण्णासाहेब बन्सीलाल भागवत सर यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली या पदावर निवड करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र चांदवड येथील राजवाड्यात राजे मल्हारराव होळकर यांच्या मामांचे वंशज आदरणीय श्रीमंत अमरजित राजे बारगळ,जहागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार, राष्ट्रीय संरक्षक ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली  व प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली माननीय प्रविण काकडे यांचे हस्ते देण्यात आले सदर प्रसंगी मा.सोमनाथ कर्णवार, पोलीस निरीक्षक मुंबई, मा. दिपक राहीज युवा आघाडी अध्यक्ष, मा. आदित्य वाघमोडे युवा आघाडी अध्यक्ष मुंबई, सरपंच निंबा तात्या कंखरे, नंदलाल धनगर सरपंच, साहित्यिक अभ्यासक देविदास बापू हटकर, सचिन सांगोरे, देविदास पाकळे दादांसह इतर मान्यवर उपस्थित होते . या निवडीबद्दल त्यांचे सर्वश्री भाऊसाहेब समाधान धनगर,  नितीनआबा निळे, एस.सी.तेले सर,  रमेशदेव शिरसाठ, गोपिचंद शिरसाठ, रविंद्र लाळगे, जयप्रकाश लांडगे, हरचंद लांडगे, प्रभाकर लांडगे, प्रदिप कंखरे, गजानन धनगर, दिनेश भलकार, जिभाऊ कंखरे, भाऊलाल पाटील, विकास सूर्यवंशी, दिलीप ठाकरे, तुषार इधे, आनंदा हडप, आनंदा धनगर सर, रविंद्र भालेराव, डी.एस.धनगर, जगदिश भागवत, आर.सी. भालेराव, अशोक कंखरे, अर्जून भागवत, लक्ष्मण निळे, बाळू देवकाते, प्रदिप रावण कंखरे, आर.पी. धनगर यांनी  अभिनंदन केले

 


Post a Comment

0 Comments