Header Ads Widget

आलाणे गावात मरीआई यात्रेची जल्लोषात सांगता; बारा गाड्यांच्या लांगडीने वेधले लक्ष


आलाणे (प्रतिनिधी):
अक्षय तृतीया निमित्त आलाणे गावात दरवर्षीप्रमाणे मरीआई मातेची यात्रा यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यावर्षीच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे प्रथमच आयोजित करण्यात आलेला खंडेराव महाराजांच्या श्रद्धास्थानाशी निगडित बारा गाड्यांची पारंपरिक लांगडी.
समस्त ग्रामस्थांच्या एकत्रित सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला. गावात सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.

लांगड पाहण्यासाठी चिरणे, कदाने, दरखेडा, हातनूर यांसह परिसरातील विविध गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पारंपरिक पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या लांगडीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

विशेष म्हणजे, संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामस्थांच्या एकोप्याचे आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यामुळे आलाणे गावाची धार्मिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments