-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=====-
शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा येथील रहिवासी भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते प्रकाश नाना चौधरी यांच्यासह पत्रकार व संपादक भालचंद्र पाटील माजी सैनिक व पत्रकार भूषण पवार यांच्यासह अनेक समर्थकांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे अर्थात शिवसेना शिंदे गटात मुंबई या ठिकाणी जाऊन प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे साहजिकच राजकीय वर्तुळात निश्चित उलथापालट होईल अशी चर्चा सर्वत्र निर्माण झाली आहे
प्रकाश चौधरी यासह आज शिवसेनेत दाखल झालेली ही मंडळी भाजपा प्रवेश करू इच्छित होते मात्र आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे दिनांक 21 एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या प्रवेशात मंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती होती सोबत धुळे प्रथम महापौर भगवान बापूजी करंनकाळ धुळे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांची उपस्थिती विशेष होती भगवान बापूजी करणकाळ यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश केला
शिंदखेडा शहर परिसर व तालुक्यातील प्रवेशस्त प्रकाश चौधरी माजी सैनिक भूषण पवार ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील मालपुर येथील रहिवासी व पत्रकार मुरलीधर माळी देवराम चौधरी गुलजार सिंह गिरासे राजेंद्र बडगुजर जितेंद्र सूर्यवंशी चंद्रकांत चौधरी सचिन चौधरी सागर बडगुजर यांचा सहभाग आहे भविष्यात शिंदखेडा शहरातील तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करण्याचा संकल्प लोकोपयोगी विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा राहील ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या योजना प्राप्त होतील त्या ठिकाणी तळागाळातील जनतेपर्यंत या सर्व योजना कशा पोहोचतील यासाठी आम्ही सामाजिक कामातून प्रयत्न करू असे आश्वासन प्रवेशस्त नागरिकांनी केला आहे प्रसंगी शिंदखेडा शहर अध्यक्ष सोनू वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्व व्यक्तींचा प्रवेश भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील यात विशेष सहभाग असणार आहे सध्या भाजपात जुने जाणते कार्यकर्ते मागे पडले असून मनात काम करण्याची इच्छा असतानाही काम करता येत नाही म्हणूनच जुन्या काळातील कार्याचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक कार्याला महत्त्व दिले जाईल असे स्पष्ट होत आहे
0 Comments