Header Ads Widget

बेटावद येथे श्री.रेणुका माता मंदिराला सोरठी राजपूत समाजाकडून स्वयंचलित ढोल-नगारा' भेट


बेटावद प्रतिनीधी.

बेटावद येथील श्री रेणुका माता मंदिरात भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम पाहायला मिळाला सोरठी राजपूत (कोष्टी) समाजाच्या वतीने मंदिरातील आरतीसाठी स्वयंचलित यंत्र ढोल-नगारा वाद्य उपहार म्हणून भेट देण्यात आले आहे या अभिनव उपक्रमामुळे मंदिरातील दैनंदिन आरती आता अधिक उत्साहपूर्ण आणि लयबद्ध वातावरणात संपन्न होणार आहे
या स्वयंचलित वाद्य यंत्रासाठी अहमदाबाद येथील श्री ओमप्रकाशजी पितांजय यांचे विशेष सौजन्य लाभले आहे तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बेटावद येथील श्री मनोज ज्ञानेश्वरजी जाधव (कोष्टी) आणि अमळनेर येथील श्री जितेंद्र छोटूलालजी वाघ यांनी मोलाचे सहकार्य केले आहे

यापूर्वी सोरठी राजपूत समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रेणुका माता यांना अहमदाबादहून आणलेला पारंपरिक 'चोला व आहेर' अर्पण करण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला होता. 
या धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भेट देण्यात आलेल्या या आधुनिक ढोल-नगारा यंत्राचे भाविकांनी आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments