Header Ads Widget

बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीतुन उतरवा हेच खरे अभिवादन ठरेल - प्रा पंढरीनाथ पाटील


प्रतिनिधी l शिंदखेडा - भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची
१४ एप्रिल१३५ वी जयंती  भाजपा कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने कार्यालयात सकाळपासूनच भाजपा सभापती, नगरसेवक व पदाधिकारी तसेच 
विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.सकाळी ९:३० वाजता कार्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिराव फुले,तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून  माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले. प्रा पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीतुन उतरवा हेच खरे अभिवादन ठरेल. बाबासाहेबांनी केलेला संघर्ष प्रा दत्तात्रय ढिवरे यांनी आपल्या कवितेतून सादर केला तसेच अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निलेश कापुरे, राहुल महिरे यांनी मनोगते व्यक्त केलीत.कार्यक्रमाचे नियोजन राहुल महिरे, राकेश महिरे व  निलेश कापुरे यांनी करून अमूल्य सहकार्य केले.
समारोपात आभार प्रा लक्ष्मण बैसाणे  यांनी केले.प्रसंगी 
उपनगराध्यक्ष उदय देसले,माजी गटनेते अनिल वानखेडे,भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,जिल्हाचिटणीस प्रवीण माळी,सभापती प्रतिनिधी गोविंद मराठे,चंद्रकांत सोनवणे,नगरसेवक सुयोग भदाणे, माजी उपनगराध्यक्ष युवराज माळी,उल्हास देशमुख, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निलेश कापुरे, दयाराम महीरे, कुणाल देसले, बिपीन पाटील, राधेश्याम पाटोळे,संतोष कापुरे, राकेश महिरे, दादा माळी,संस्थाध्यक्ष स्वप्नील देसले, राहुल महिरे,गोपाल चौधरी, सागर तेली आदी व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments