व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ शिंदखेडा व महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशन मालपुरचा स्तुत्य उपक्रम; महिला आरोग्य व गर्भवती मातांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
धमाणे (ता. शिंदखेडा) | प्रतिनिधी – मुरलीधर माळी
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या आशा सेविकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. धमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी आशा सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ, शिंदखेडा तालुका व महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशन, मालपुर यांच्या आयोजनाखाली तसेच सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
आशा सेविका या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी सातत्याने जोडलेल्या असतात. गावातील महिला, बालके, गर्भवती माता तसेच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविणे, लसीकरणाबाबत जनजागृती करणे, गर्भवती मातांना वेळोवेळी आरोग्य केंद्रात आणणे, माता-बाल आरोग्याची काळजी घेणे आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, अशी अनेक महत्त्वाची कामे आशा सेविका करीत असतात.
मात्र, समाजाच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन आशा सेविकांची मोफत आरोग्य तपासणी व्हावी आणि त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
५० आशा सेविकांनी घेतला आरोग्य तपा�
0 Comments