🚩🚩🚩🚩🚩🚩 श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधि यांचेकडुन दोंडाईचा येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७६ वी संजीवन समाधी सोहळा सकाळी ९ वाजता समाज मंगल
कार्यालयाच्या जागेवर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालकीची व प्रतिमेची पुजन व आरती अध्यक्ष श्री. मनोज मेटकर व सौ. मिनाक्षीताई मेटकर यांच्या हस्ते करण्यात येऊन पालखी मिरवणूक मंगल कार्यालयापासुन चुडाणे रोड, संतोषी माता मंदीर, गणपती मंदीर, पिंपळ चौक, आझाद चौक, गांव दरवाजा, पंचवटी भागातुन निघुन शेवटी मंगलकार्यालयाच्या जागेवर दुपारी १२ वाजेला संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालकीची उपाध्यक्ष श्री. देवेंद्र गवळे व सौ. अश्विनीताई गवळे, सचिव श्री. सतीष जाधव व सौ. कल्पना ताई जाधव यांच्या हस्ते आरती करून विर्सजन करण्यात येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पुजा करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
यावेळी समाजाला मार्गदर्शन करताना सल्लागार श्री. पांडुरंग शिंपी यांनी मंगल कार्यालय भिंतींचे बांधकामा करिता सिमेंट करिता आवाहनाच्या प्रतिसादास १०५ सिमेंट बॅग मिळाल्या आहेत तसेच कल्याण येथील दानशुर समाज बांधव डाॅ मनिलाल शिंपी ( ए.एस. पी.कंमान्डर ) यांनी २५ सिमेंटच्या बॅग दिल्या असुन अनेक समाजबांधव व ईतर समाजाचे दानशुर बांधवांनी सिंमेटच्या थैल्या समाज मंगल कार्यालयाच्या बांधकामास देणगी स्वरूपात दिल्या तसेच प्रा.प्रकाश भांडारकर व श्री. किशोर गवळे यांनी समाजाचे होत असलेल्या नियोजित मंगलकार्यालयाच्या बांधकाम पुर्ण करण्यास आवाहन केले यावेळी ज्या समाज बांधवानी आज देणगी दिली त्या समाज बांधवांच्या सत्कार करण्यात आला.
समाजातील निवॄत्त झालेले श्री. ज्ञानेश्वर चित्ते व प्रा. प्रविण शिंदे यांचा तसेच भजनी मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
समाजातील इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्र अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार व सदस्यांच्या हस्ते देण्यात आल्या.
दोंडाईचा शहर मा. महिलाध्यक्षा सौ. मंगलताई जाधव व सौ. आरतीताई बाविस्कर, बदलापूर यांनी समाजाच्या होत असणाऱ्या कार्यक्रमासाठी पूजेचे ताट, समई, कलश, फुलदाणी व इतर वस्तु त्यांचेकडून समाज मंगल कार्यालयास सप्रेम भेट दिल्या.
सल्लागार प्रा. प्रकाश सुकलालशेठ भांडारकर यांनी लकी ड्रॉ करिता ५ भेट वस्तूंचे प्रायोजक बनले होते. तसेच समाज बांधवांनी लकी ड्रॉ योजनेत भाग घेऊन कुपन बाॅक्स जमा केले होते. उपस्थित असलेल्या समाज बांधवाच्या लहान मुलांच्या हस्ते पाच लकी भाग्यवान विजेत्या समाज भगिनींचे कुपन काढण्यात आले व बक्षीस पात्र महिलांना भेटवस्तू अध्यक्ष, प्रायोजक, उपाध्यक्ष व महिलाध्यक्षा यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
तसेच श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी सुंदर असे माऊली माऊली गाण्यांवर टाळ वाजवून नॄत्य करून कार्यक्रमांची शोभा वाढवली तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री मनोज मेटकर, उपाध्यक्ष श्री देवेंद्र गवळे, सचिव श्री. सतीष जाधव, सहसचिव प्रा.राजेंद्र कोटुंरवार, सल्लागार प्रा. प्रकाश भांडारकर, श्री. पांडुरंग शिंपी, श्री. मधुकर जाधव, प्रा. संजीव संधानशिवे, श्री. शरद पवार, कार्यकारिणी सदस्य श्री. चंद्रकांत कापुरे, श्री. दिलीप सोनवणे, श्री. रामचंद्र चित्ते, श्री. हरीदास जगताप, धुळे जिल्हा युवाध्यक्ष श्री. विशाल कापडे, श्री राजेंद्र गवळे, श्री गोवर्धन पवार, श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, मा. युवाध्यक्ष चि, सागर पवार, विजय संधानशिवे, श्री महेन्द्र जगताप, श्री सचिन जगताप, श्री दिपक पवार, श्री नरेंद्र जगताप, चि. भुपेंद्र चव्हाण, श्री. राहुल जगताप, श्री. सतीष गवांदे, श्री. दिनेश मेटकर, श्री निलेश चित्ते, श्री. अजय सोनवणे, चि. सुदर्शन सोनवणे तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ शितलताई कोंटुरवार, सौ पुनमताई सांळुखे, सौ वर्षा खैरनार, सौ रत्ना चित्ते, अ.भा.महिला आघाडीच्या सहप्रसिध्दी प्रमुख सौ सुनिता शिंपी, धुळे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखा जाधव, महिला तालुकाध्यक्ष सौ हेमलता पवार, सौ. आशाताई गवळे, सौ. भारतीताई जगताप यांनी व सर्व समाज बांधवानी विशेष परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीव संधानशिवे यांनी केले. उत्कृष्ट सुत्रसंचालन सहसचिव प्रा. राजेंद्र कोंटुरवार तसेच शेवटी आभार प्रदर्शन सचिव श्री. सतीष जाधव यांनी केले.
0 Comments