बेटावद प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ. ४ थी - २०२६ चा निकाल जाहीर झाला असून धुळे जिल्हा गुणवत्ता यादीत शिरपूरच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
जनता शिक्षण प्रसारक संस्था, बेटावद येथील शिक्षक श्री. दीपक वाडिले यांचे चिरंजीव कु. आदित्य दीपक वाडिले याने या परीक्षेत ३०० पैकी २३२ गुण (७७.३३%) प्राप्त करून धुळे जिल्हा गुणवत्ता यादीत ७६ वा क्रमांक मिळवला आहे.
आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे शिक्षण घेणाऱ्या आदित्यने पेपर-१ (प्रथम भाषा व गणित) मध्ये ११८ गुण आणि पेपर-२ (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी) मध्ये ११४ गुण मिळवले आहेत.
शिक्षक कुटुंबातील संस्कार, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आदित्यने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे. त्याच्या या यशामुळे वाडिले कुटुंबासह आर. सी. पटेल विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्याच्या या यशाबद्दल आर. सी. पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी आणि बेटावद-शिरपूर परिसरातील नागरिकांकडून त्याचे हार्दिक अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments