शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
पावसाने दिलेली मोठी उघडीप, प्रतिकूल हवामान आणि पाण्याअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत मागणीची गंभीर दखल घेत प्रशासनाने अखेर प्रत्यक्ष शिवार पाहणी व पंचनाम्यांच्या कामास सुरुवात केली आहे. आज (दि. ४ ऑक्टोबर २०२६) शिंदखेडा शिवारात तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या आदेशानुसार, तलाठी आप्पा जितेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
पावसाची दीर्घ कालखंड, प्रतिकूल हवामान आणि सिंचनासाठी पाण्याची कमतरता जाणवु लागल्यावर
प्रामुख्याने कापूस, मका आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या आदेशानुसार तलाठी आप्पा जितेंद्र चव्हाण व कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून प्रत्यक्ष शिंदखेडा शेत शिवारात पाहणी केली.
नुकसानग्रस्त प्रत्येक शेताचा अचूक व पारदर्शक पंचनामा करून शासनाने तातडीने भरीव मदत जाहीर करावी.
प्रशासन प्रत्यक्ष शेतात दाखल झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी तलाठी पथकाने प्रत्यक्ष पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांकडून नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली.
या पाहणी मोहिमेदरम्यान सुनील चौधरी, दरबार गिरासे, नारायण मराठे, दत्तात्रय देसले, अविनाश देसले, श्यामकांत पवार चौधरी, राजेंद्र चौधरी, भूषण मराठे, देवराम चौधरी, गोरख देसले, दिगंबर मधुकर पाटील, राजेंद्र तुकाराम चौधरी, बाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
“पंचनामे तातडीने पूर्ण करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या!”
“शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस मदतीसह खंबीरपणे उभे राहावे!” अशी आर्त हाक यावेळी शिंदखेड्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. हयाप्रसंगी तलाठी जितेंद्र चव्हाण यांनी आव्हान केले आहे की शेतकऱ्यांनी आधार कार्ड फार्मर आयडी बँकेचे पासबुक व सामूहिक क्षेत्राची संमती पत्र या सर्व छायांकित प्रत तलाठी कार्यालयात जमा करावे.
0 Comments