*दोंडाईचा* ( प्रभाकर आडगाळेप्रतिनिधी)- येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे, श्रीमंत राजे दौलतसिहंजी रावल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रा. रेवती बागुल यांनी प्रास्ताविकातून महात्मा गांधीजींच्या कार्याविषयी माहिती सांगून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे व प्राध्यापकांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधीजींच्या मते, स्वच्छता ही केवळ
शासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांना स्वच्छता ही स्वातंत्र्या इतकीच महत्त्वाची वाटत असे. त्यासाठी केवळ आपली वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची नसून आपले घर, परिसर, गाव,शहर व संपूर्ण देश स्वच्छ ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे स्वच्छतेचे काम करणे ही सुद्धा समाजसेवाच आहे. 2 ऑक्टोबर 2014 पासून महात्मा गांधींची जयंती स्वच्छता अभियान म्हणून साजरी केली जाते. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !" राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम. ठाकरे यांनी आभार मानले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व वर्ग खोल्यांची स्वच्छता उत्स्फूर्तपणे केली.
कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्रा. पी.डी. बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. एस. एम. ठाकरे आणि प्रा. आर.पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. योगिता चौधरी, प्रा. निशा ठाकूर, प्रा. अमृता चव्हाण व प्रा. खाचणे यांनी प्रयत्न केले. तर कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी बी.एड द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते..
0 Comments