बोराडी : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. बी. आर. आंबेडकर अध्यापक विद्यालय, बोराडी येथे जागतिक शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुचित्रा वैद्य मॅडम होत्या.
याप्रसंगी छात्र अध्यापकांच्या वतीने प्राचार्य डॉ. सुचित्रा वैद्य तसेच अध्यापकाचार्यांचा सन्मान करण्यात आला. छात्र अध्यापकांनी शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुचित्रा वैद्य मॅडम यांनी शिक्षकांच्या नैतिक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांचे विश्लेषण केले. शिक्षकांचे समाजातील महत्त्व विशद करताना शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्र अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र अध्यापक निलेश तडवी यांनी केले, तर छात्र अध्यापिका जयश्री कोळी यांनी आभार मानले.
0 Comments