Header Ads Widget

1500 रुपयाची लाच स्विकारतांना तलाठी लाचलुचपत विभागाच्या “ताब्यात”

1500 रुपयाची लाच स्विकारतांना तलाठी लाचलुचपत विभागाच्या “ताब्यात”


  • Post author:
  • Post

बातमी कट्टा:- 1500 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ तलाठीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात इला आहे.यापुर्वी देखील पैसे स्विकारतांना याच तलाठीवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती.

तक्रारदार पुरुष वय 30 रा.नवापूर जि.नंदुरबार यांचे वडीलांचे डोगेगाव शिवार तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे गट क्रमांक 101/2 ही शेतजमीन आहे. सदर जमिनीचे सातबारा उताऱ्यावर त्यांचे वडिलांचे लागलेल्या नावात दुरुस्ती होण्यासाठी तलाठी जयसिंग पावरा यांनी नमूद काम करण्यासाठी तक्रार यांच्याकडे दि 20 रोजी 1500 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.आज दि 27 रोजी तलाठी जयसिंग पावरा हे खांडबारा ता.नवापूर मंडळ कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून 1500 रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले.संशयित तलाठी जयसिंग पावरा याला यापुर्वी 2018 साली देखील नंदुरबार तलाठी कार्यालयात लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती.सदरची कारवाई
सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक,निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली साफळा अधिकारी शिरीष जाधव पोलीस उप अधीक्षक नंदुरबार,जयपाल अहिररराव पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.
नंदुरबार,HC महाजन, HC गुमाणे,PN दीपक चित्ते ,मनोज अहिरे,संदीप नावडेकर,अमोल मराठे,WPN ज्योती पाटील, चालक HC मनोहर बोरसे आदींनी कारवाई केली आहे.



Post a Comment

0 Comments