प्रतिनिधी अमळनेर- अमळनेर मतदारसंघातील वीज उपकेंद्रांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी अर्थसंकल्पात समावेश करावा अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन केली.
बुधवारी आमदार अनिल पाटील यांनी मंत्रालयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली त्यात अमळनेर मतदारसंघात विजेची टंचाई व वाढती वीज मागणी लक्षात घेता मतदारसंघातील समस्या मांडल्या यावेळी त्यांनी दिलेल्या पत्रात त्यात पाच नवीन 33 के व्ही उपकेंद्र प्रस्तावित करणे 3 उपकेंद्र ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढविणे यासह नवीन व जुन्या 33 के व्ही वाहिन्या 220 के व्ही टाकरखेडा उपकेंद्राला जोडणे यासह अमळनेर येथे महावितरण कंपनीचे नवीन विभागीय कार्यालय मंजूर करणे आदींबाबत चर्चा केली.
नवीन पाच उपकेंद्रात 33 के व्ही सारबेटे, 33 के व्ही मंगरूळ 33 के व्ही फाफोरे, 33 के व्ही मारवड, पारोळा तालुक्यातील 33 के व्ही शेळावे आदी पाच ठिकाणी प्रस्तावित करण्याची मागणी केली. तसेच 33 के व्ही अमळनेर शहर क्षमता वाढ करणे ( 5 एमव्हीए 10 एमव्हीए) , 33 के व्ही वावडे ( 5 एमव्हीए अतिरिक्त) 33 के व्ही कळमसरे (5 एमव्हीए अतिरिक्त) अशा तीन ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पावर क्षमता वाढ करणे नवीन व जुन्या 33 के व्ही वाहिन्या 220 के व्ही टाकरखेडा उपकेंद्राला जोडणी करणे नवीन 33 के व्ही अंबर्शी टेकडी उपकेंद्र, 33 के व्ही पातोंडा विजवाहिनी स्थलांतरित करणे 33 के व्ही सारबेटे नवीन वाहिनी करणे आदी मागण्या केल्या यासह याठिकाणी विभागीय वीज वितरण कंपनीचे कार्यालय मंजूर करावे जेणे करून नागरिकांना काम सोईचे होईल अशा मागण्या यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील केल्या त्यावेळी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले असून सदर कामे अर्थसंकल्पात प्रस्तावित करून मंजूर केली जातील असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 Comments