Header Ads Widget

पत्रकार पेन्शन योजनेत होणारी पत्रकारांची अडवणूक थांबवा मराठी पत्रकार परिषदेचे अजित पवारांना साकडे




नगर : महाराष्ट्र सरकारने वयोवृद्ध पत्रकारांनी
पत्रकार पेन्शन योजना सुरू केली असली
तरी तोंड पाहून पेन्शन योजनेचे अर्ज मंजूर
केले जात आहेत त्यामुळे या योजनेच्या
जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी
मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय
चिटणीस मन्सूरभाई यांनी आज उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्याकडे केली..
अजित पवार आज एका कार्यक्रमासाठी
नगरला आले होते.. त्यावेळी मराठी पत्रकार
परिषदेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन
निवेदन दिले.. महाराष्ट्रातील अनेक पात्र
पत्रकारांचे अर्ज आकसाने नाकारले जात
आहेत.. त्यांची अडवणूक केली जात आहे..
त्यामुळे धुळ्याच्या पत्रकारांनी 6 जानेवारी
रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
करून आपला संताप व्यक्त केला..
अजूनही पात्र पत्रकारांचे अर्ज नाकारले
जात असल्याने राज्यभर संतापाची भावना
असल्याने सरकारने तातडीने नियमात बदल
करून ज्येष्ठांना सन्मानाने पेन्शन मिळेल
अशी व्यवस्था करावी अशी मागणीही
निवेदनात करण्यात आली आहे..


Post a Comment

0 Comments