दोंडाईचा: माजी मंत्री आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या स्थानिक विकास निधीतून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून तिचे लोकार्पण आज आ. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. जयकुमारभाऊ रावल, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, अशोक देसले, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, वैद्यकीय अधिकारी भूषण काटे, विनय पवार, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, माजी उपनगराध्यक्ष युवराज माळी, नगरसेवक
चेतन परमार, जितेंद्र जाधव, किसन सकट, बाळासाहेब गिरासे, विनोद पाटील, अर्जुन भिल, तसेच मनोहर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, माजी नगरसेवक राहुल कचवे, आर एच भामरे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक चौधरी, विनोद चौधरी, राजू पहाडी, दिनेश सूर्यवंशी, दादा मराठे, सुरज देसले, ग्रामीण रुग्णालय समितीचे सदस्य प्रकाश चौधरी, राहुल महिरे, अरविंद वर्मा, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विनय पवार , नितीन भराडे , उज्वल पाटील, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments