दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे नेहरू युवा केंद्र,युवा परिवर्तन फाऊंडेशन, धावडे, व संकल्प सेवा फाऊंडेशन,दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वछता व श्रमदान अभियान कार्यक्रम" दि. 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2021 पर्यंत रावल नगर परिसर, दोंडाईचा येथे राबविण्यात येत आहे.
सदर अभियान नेहरू युवा केंद्र चे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, मार्गदर्शन खाली सुरु आहेत. स्वछता अभियानात "हम सबका एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा" या घोषवाक्याच्या माध्यमातुन युवकांना स्वच्छता व श्रमदान चे महत्व पटवून देण्यात आले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी युवा परिवर्तन फाउंडेशन,धावडे व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मोहन पाटील तसेच संकल्प फाऊंडेशन च्या अध्यक्षा अश्विनी जाधव, दिपाली पाटील,राहुल माळी, गणेश, विशाल खंडागळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments