Header Ads Widget

*महावितरण च्या विद्युत वाहिनी वरती अनधिकृत(आकडे टाकून वापर करणारे) शेतीपंप चालवणाऱ्या लोकांसाठी महत्वाची सूचना*



1.सर्व अनधिकृत शेतीपंप विज कनेक्शन वापरणाऱ्या ग्राहकांना ही शेवटी संधी असून ज्यांचे अजून कनेक्शन नाही त्यांनी सर्वांनी आपल्या संबंधित जनमित्र/वायरमन यांचेशी संपर्क करून लवकरात लवकर विज कनेक्शन घेणेची कार्यवाही करावी.....

2.ज्या ग्राहकांना पोल लागणार नाहीत त्यांना तात्काळ 24 तास मध्ये कनेक्शन दिले जाणार आहे.....

3.ज्या ग्राहकांना एल टी चे पोल (4पोल पर्यंत) लागणार आहेत त्यांनाही शासन निर्णय नुसार कोटेशन भरलेल्या तारखेपासून यादी नंबर प्रमाणे कनेक्शन दिले जाणार आहेत...

4.ज्या ग्राहकांचे एल टी 4 पोल पेक्षा जास्त अंतर आहे व मेन लाईन एच टी चे 10 पोल च्या आत अंतर आहे अश्या ग्राहकांना स्वतंत्र एचव्हीडीएस 16KVA चा ट्रान्सफॉर्मर मंजूर होणार आहे....तरी सर्वांनी अनधिकृत केबल न टाकता नवीन कनेक्शन साठी कागदपत्रे जमा करून कोटेशन भरावे...

5. ज्या ग्राहकांचे एल टी लाईन चे अंतर 4 पोल(800फूट) पेक्षा व मेन लाईन चे अंतर 10 पोल(2000फूट) पेक्षा जास्त आहे ग्राहकांना अनुदान नुसार सोलर पंप बसणार आहेत....

*6.जे ग्राहक सदर शेवटच्या संधीचा लाभ घेणार नाहीत व आपल्या वायरमन यांना खूप वेळा सांगूनही अनधिकृत आकडे टाकूनच वापर करणार आहेत त्यांच्या सर्वांवरती भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 अन्वये विज चोरीचा गुन्हा दाखल होणार आहे.....*

7.सर्व अनधिकृत विज वापरणाऱ्या शेतीपंप ग्राहकांची डीपी प्रमाणे यादी आपल्या गावातील वायरमन जवळ आहे....त्यामुळे जे लोकबआकडे टाकून विज वापर करत आहेत व कनेक्शन ही घेत नाहीत त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल होणार आहे...

8.तरी सर्वांनी ही शेवटची संधी सोडू नका.... भविष्यात पुन्हा कोटेशन मिळणार नाहीत...त्यामुळे आजच आपल्या संबंधित वायरमन यांचेशी किंवा महावितरण  शाखा कार्यालय यांचेशी तत्काळ संपर्क करून आपण आपले विज पंप कनेक्शन अधिकृत घेणेची कार्यवाही करावी.
💡💡महावितरण💡💡


Post a Comment

0 Comments