शिंदखेड़ा(प्रतिनिधी):-ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्हा संघटकपदी प्रा.चंद्रकांत डागा तर सहसंघटकपदी पी.झेड. कुंवर,सचिव पदी एस.पी.नेतकर यांची निवड करण्यात आली. राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड़ यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष प्रा.बाबा साहेब जोशी यांनी ही निवड केली.जिल्हाध्यक्ष एडवोकेट जे.टी.देसले यांनी सूचित केल्यावर ही निवड झाली.तसेच प्रकृतिच्या कारणाने जिल्हा संघटक पदाचाराजीनामा देणारे रविंद्र महाजनी जिल्हा सदस्य तर विभाग सचिवपदी निवड झाल्याने सह जिल्हा सचिव पदावर असणारे डॉ. अजय सोनवणे निमंत्रक म्हणून कार्य पाहतील व इतर जिल्हा कार्यकारिणी तशीच राहिल. प्रा.चंद्रकांत डागा हे शिंदखेड़ा तालुका अध्यक्ष पदावर होते. ग्राहक जागृती संबधी सन 2001पासून कार्य सुरु केले. 2009पासून ग्राहक पंचायतशी जुड़ले व त्याच वर्षी इंदापुरला झालेल्या राज्य स्तरीय अभ्यास वर्गात ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांचे वक्तव्य ऐकून प्रभावित झाले.अनेक शाळा, ज्यू.कॉलेज,महाविद्यालय, तहसील कार्यालय मध्ये अनेक वर्षापासून प्रा.डागा हे ग्राहक संरक्षण कायदा बाबत जन जागृती करत आहे.ते संरक्षण परिषदेचे सदस्य ही आहेत. त्यांच्या निवडीचे ग्राहक पंचायतचे विभाग,जिल्हा व तालुका कार्यकारिणी,प्राध्यापक वर्ग व नागरिकांनी अभिनंदन केले.
0 Comments