नवी दिल्ली, 30 जानेवारी : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईच्या (CBSE) विद्यार्थ्यांसाठी (students) आता एक खूशखबर आली आहे. विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. दहावीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयाच नापास होणार नाही.
ही बातमी आहे दहावीच्या (10th class) विद्यार्थ्यांसाठी. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित (mathematics) किंवा विज्ञानात (science) नापास झाला आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात (skill subject) उत्तीर्ण झाला तर त्याला पास असल्याचंच समजलं जाईल.
बोर्डाकडून हा नियम विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी बनवला गेला आहे, जे हुशार आहेत पण अभ्यासात थोडे कच्चे आहेत. या निर्णयाचं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही जोरदार स्वागत केलं आहे. भारत सरकारचं (Government of India) 'स्किल इंडिया इनिशिएटिव्ह'सुद्धा समोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईनं निश्चित केलेल्या कौशल्याधारित विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा रस दरवर्षी वाढतो आहे. 2020 मध्ये 20 टक्के विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित विषय निवडले होते. हीच संख्या 2021 मध्ये 30 टक्क्यांवर गेली.
दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी घोषणा केली, की CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक २ फेब्रुवारीला घोषित केले जाईल. जाहीर झाल्यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची डेटा शीट https://www.cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. भारतभरात दहावी आणि विद्यार्थी सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेला बसणार आहेत. केंद्रानं कंटेनमेंट झोन बाहेरच्या शाळांना टप्याटप्यात उघडण्याची आणि मर्यादित उपस्थितीत चालू करण्याची परवानगी दिली आहे. इथे कोविडसंबंधीचे प्रोटोकॉल्स पाळणं अपेक्षित आहे.
0 Comments