Header Ads Widget

जगभरातील प्रामाणिक देशांची यादी जाहीर, पाहा हिंदुस्थान कितव्या स्थानावर?



गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील प्रामाणिक देशांची यादी जाहीर करण्यात येते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या आधारावर ही यादी तयार करण्यात येते. अनेक देश आजही भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. 180 देशांमध्ये सर्वात प्रामाणिक आणि सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे असणारे देश अशी दोन्हींची माहिती मिळते. ट्रांसपरेंसी इंटरनॅशनलने ही यादी जारी केली आहे.

Transparency International मधील रिपोर्ट मध्ये सांगण्यात जाहीर करण्यात आल्यानुसार कोरोनाकाळातील सर्वात प्रामाणिक पाच देश अनुक्रमे डेनमार्क, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन हे आहेत. तर सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले पाच देश अनुक्रमे वेनेजुएला, येमेन, सीरिया, सोमालिया आणि दक्षिण सुदान हे आहेत.

भ्रष्टाचारी देशांच्या यादीत 180 देशांमध्ये हिंदुस्थानचा क्रमांक कितवा हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल तर त्याचे उत्तर आहे 86 वा. 2019 मध्ये हिंदुस्थान 80 व्या क्रमांकावर होता. आता तो 86 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

या अहवालात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे ज्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आहे अशा देशांमध्ये कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Transparency International द्वारे अहवाल तयार करताना अनेक बाबी या लक्षात घेण्यात येतात. विविध क्षेत्रातील लोकांची मते, भ्रष्टाचाराची प्रकरणे, करण्यात येणारी कारवाई आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी करण्यात आलेले उपाय अशा अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात. ही रँकिंग 0 ते 100 क्रमांकावर आधारित असते. 0 अंक त्या देशाला मिळतो जिथे सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. तर जिथे सर्वात कमी भ्रष्टाचार आहे अशा देशाला 100 अंक मिळतात.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये पाकिस्तानची स्थिती अत्यंत खराब आहे. 180 देशांमध्ये पाकिस्तान 124 व्या स्थानावर आहे. चीन 78 व्या, नेपाळ 117 व्या आणि बांग्लादेश 146 व्या देशावर आहे. स्वत:ला जगाची महासत्ता म्हणवणारी अमेरिका ही 67 व्या स्थानावर आहे. यंदाच्या यादीत अमेरिकेचे रँकिंग कमी झाले आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते न्यूझीलंडचे. या देशात भ्रष्टाचार नाही असे सांगितले जात. प्रामाणिक देशांच्या यादीत न्यूझीलंड आणि डेनमार्क हे दोन्ही देश 88 गुणांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर 85 गुणांसह फिनलँड प्रामाणिक देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांमध्ये दक्षिण सूदान आणि सोमालिया या दोन देशांचा पहिला क्रमांक लागतो. या दोन्ही देशांना अवघे 12 गुण मिळाले आहेत. हे दोन्ही देश प्रामाणिक देशांच्या यादीत 179 व्या स्थानावर आहेत.

26 देशांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलत आपला चांगले गुण मिळवत चांगल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामध्ये ग्रीसचा क्रमांक लागतो. प्रामाणिक देशांच्या यादीतील स्थान सुधारत ग्रीसने 14 स्थान पुढे झेप घेतली आहे. म्यानमारने 13 तर इक्वेडोरने 7 स्थान पुढे झेप घेतली आहे. 22 देश असे आहेत ज्यांची घसरण झाली आहे. बोस्निया-हर्जेगोविना आणि मलावी 7-7 अंकांनी खाली आहेत. तर लेबनान हा देश पाच स्थान खाली घसरला आहे.




Post a Comment

0 Comments