Header Ads Widget

*मेल्यावर स्वर्ग रथाचे सुख तरी, प्रत्येक नागरिकास मिळायला पाहिजे....*. *अमरधामपर्यंत जाणाऱ्या अमररथची मागणी कधी पुर्ण होईल...*



*जनमत-*

*दोंडाईचा-* शहराचा रहिवास एरिया दिवसेंदिवस वाढत चालला आहे.म्हणजे धुळे रस्त्यावरील रहिवास एरिया ते नंदुरबार रस्त्यावरील रहिवास एरिया जवळपास सहा किलोमीटरच्या आसपास पसरून गेला आहे. तीच परिस्थिती शहादा रस्त्यावरील रहिवास एरिया ते मालपूर रस्त्यावरील रहिवास एरियाची आहे. त्यात मागील सहा वर्षांपासून नगरपालीकेकडून जी लांब-लांब गावाबाहेर वेगवेगळ्या आड रस्त्यावर घरकुल बांधून दिले आहे. ती सर्वसामान्य माणसाला गावात ये-जा करण्यासाठी व वस्तू ने-आण करण्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. पण ते म्हणतात ना,गरजवान मरता क्या ना करता. म्हणून लोकांनी गरजेपोटी ही घरे घेतली. पण सर्व दैनंदिन त्रास सहन केल्यावरही खरी पंचायत तेव्हा होते.जेव्हा ऐवढया लांब-लांब गावाबाहेरील एरियात,वेगवेगळ्या रहिवासी काँलनीमध्ये एखाद्या व्यक्तीचा मुत्यू होतो.तेव्हा त्याच्या घरातील मंडळी दु:ख सागरात लोटलेली असतात,आणि नातेवाईक मित्रपरिवार, शेजाऱ्यांना डेडबाँडी अमरधामपर्यंत घेऊन कशी जायाची याची पंचायत पडलेली असते,अशावेळेस शोधाशोध व अथक परिश्रम केल्यावर जेव्हा हाती जे वाहन मिळते,तेव्हा सुटकेचा श्वास सोडत अंतविधीसाठी राबणारे बरीच मंडळी हेच म्हणतात की,शेवटी, शेवटी का असेना मेल्यानंतर स्वर्ग रथाचे सुख माणसाला नगरपालीकेने हक्काचे उपलब्ध केले पाहिजे, अशी खंत ते व्यक्त करत असतात आणि ही मागणी अनेक वर्षांपासून लांब लांब फोफावलेल्या रहिवासी एरिया मधून केली जात आहे. म्हणून आतातरी नगरपालीकेने जनादर राखून मागणी पुर्ण करायला हवी,अशी अपेक्षा त्या रस्त्याने जीवनाच्याशेवटी जाणारा गावातील प्रत्येक नागरिक करित आहे.

मेल्यानंतर स्वर्ग रथ व अमरधामपर्यंत शव वाहून नेणाऱ्या अमर रथाचा विषय गावात सहज गाजला नसता. याला कारणही तसे आहे. म्हणजे गरिबांकडे छतावरून पाण्याचे बुळबुळे पडले काय? व कावळ्याने पाऊसात घर बांधले काय? तर लोक यांना गरिब म्हणवून त्यांचे घर बांधायचे सोयरेसुतक नसते, याउलट एखाद्याने जर ऐसपैस घर बाधले व त्याच्यात कारंज्या लावल्या तर लोक त्याला श्रीमंतीचे रूप देवून चारही बाजूला त्याच्या श्रीमंतीचा गाजावाजा करतात. मग असाच काही प्रकार काल गावात सर्व गोष्टीने सुखी,दानशूर,सुपरिचित व्यक्तीच्या निधन समयी, योग्य वेळी, पाहिजे तसे सुविधासह स्वर्गरथ न मिळाल्यामुळे *मेल्यानंतर स्वर्ग रथ* प्रत्येकाला मिळायला पाहिजे, ह्या विषयांवर मयताच्या घरापासून ते अमरधामपर्यंत हा विषय विविध लोकप्रतिनिधीसह,विश्लेषक मंडळीमध्ये अग्नीदाहसारखा गरमावुन गेला. येथे प्रत्येकजण सांगत होता.ऐवढे मोठे गाव आहे आपले,दिवसेंदिवस रहिवासी एरिया चारही बांजूनी वाढत आहे. एखाद्याकडे जेव्हा कोणी व्यक्ती मयत होते.तेव्हा स्वर्ग रथाचा विषय गरमावतो व अमरधाममधून बाहेर पडल्याबरोबर विषय शांत होऊन जातो. आता आपण गावात चांगला,सर्वसोयीयुक्त स्वर्ग रथ बनवायला पाहिजे. त्यासाठी आपण गावातील दानशूर व्यक्तीची व विविध सेवाभावी संस्थाची मदत घ्यायला हवी. तेव्हा तेथे चर्चेत उपस्थित असलेला माजी नगरसेवक यांनी सांगितले की,आम्ही सेवाभावी वुत्तीतुन मागील सहा वर्षापुर्वी विजयप्रभा नावाने स्वर्ग रथ सुरु केला होता. मात्र त्यात वेळोवेळी आम्हाला ड्रायव्हर, मेंन्टनंस, डिझेल,देखरीचा अभाव ह्या कारणास्तव गाडी धुळखात पडायची.जेव्हा गावात मयतीचा ठिकाणी तिची गरज भासायची ,तेव्हा ऐनवेळेस चालू न होता ,धोका द्यायची. तदनंतर आम्ही मग सेवाभावी वुत्तीसह माफक दर संबधित लोकांकडून घेणे चालू केले.तरी हाती निराशाच लागली व आज गाडी बऱ्याच दिवसापासून दवाखान्यात आहे, लवकरच कोणी दानशुर मिळाला तर तीला दुरूस्त करून गावात आणू,असे सांगितले. काहींनी मग ती गाडी खराब असेल तर मी गाडी देतो,तर दुसरा म्हणे मी नवीन बोलोरो पिकअप घेऊन देतो.मग अशातच अंतविधी झाला व त्या विषयाचाही त्याठिकाणी अंत झाला.

यामाध्यमातुन ठिकाणाहून आम्हाला ऐवढेच लक्षात आले व म्हणायचे आहे की, हाच विषय,प्रश्न एखाद्या गरिबांकडे मयताच्या ठिकाणी पडला तर त्याचे सोयरेसुतक नसते व पद,प्रतिष्ठा, दानशूर व्यक्तीकडे पडला तर सर्व जमलेली गावातील मंडळी त्याच्यावर सोलूशन शोधतात. जसे गावात मा.मुख्यमंत्री येणार असतील तर अनेक वर्षांपासून खड्डे पडलेले रस्तेही रातोरात तंदुरुस्त होतात. तशाच प्रकार हा आहे. शेवटी जनता एकच म्हणते ,गावाचा विकास होवो,तो कोणत्याही मार्गाने होवो.भले मा.मुख्यमंत्री एक दिवसाला का गावात येत नाही. पण रस्ते दोनतीन वर्षासाठी सुधरतात.तशाच हा मयताला स्वर्गरथातुन अमरधामपर्यंत नेण्याचा विषय एखाद्या दानशुर व्यक्तीच्या मयताला आलेल्या अडचणीच्या माध्यमातून का मार्गी लागेना. पण पुढील गावातील मयत हो... सर्वस्तरातील लोकांचे तरी हाल होणार नाही, हेच दिसुन आले.

*नगरपालीकेने आपली जबाबदारी समजून, स्वर्ग रथाचा प्रश्न मार्गी लावावा...*

नगरपालीका पुर्वी गावात एखाद्या कोणी बेवारस किंवा आर्थिक परिस्थितीने, गरीब परिवारातील व्यक्ती मेला, तर त्याच्या अंतविधीसाठी जे मन दोन मन लाकुड लागायचे. ते अंत्यत अल्पदरात उपल्बध करून द्यायचे.आजही ही सुविधा नगरपालीकेची चालू आहे.पण तिची गरज खुप क्वचित लोकांना पडते.आता गावाचा रहिवासी एरिया ईतका झपाट्याने वाढत चालला आहे की, ही बाजू ते ती बाजू गाठायची म्हटली तर सहा किलोमीटरचे अंतर कापावे लागेल. त्यात नगरपालीकेने बांधलेली घरकुले गावाबाहेर असल्यामुळे, गरिब लोकांना दैनंदिन कामांनाच अडचणीची ठरतात. त्यात ह्या नवीन घरकुल वसाहतीत व नवीन काँलनीमध्ये एखाद्या परिवारात दु:खाची घटना घडली तर मयताचे शव अमरधामपर्यंत आणायला प्रत्येकाला अडचण येते. त्यात खांदे देणाऱ्यांचे खांदेही एवढेही मजबूत नाही की,ते तीन चार किलोमीटर पर्यंत मयताला एकसारखे खांदे देतील. म्हणून जो-तो शेवटच्या क्षणी अमरधामपर्यंत पोहचवण्यासाठी स्वर्ग रथाची वाट पाहतो.म्हणून मागे अडचणीच्या करोना काळात जसे सरकारने मयताची अमरधामपर्यंत विल्हेवाट लावायची,जेवढी काळजी घेतली.आपण भले तेवढी न घेता .गावात वाढलेली रहिवासी एरियाची परिस्थिती पाहता,नैतिक जबाबदारी समजून, समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी एक चांगली, सुसज्ज स्वर्ग रथाची व्यवस्था करायला हवी.जेणेकरून शेवटच्या क्षणी मयताचे व परिवारातील व बाहेर गावाहून आलेल्या लोकांचे हाल होणार नाहीत. ऐवढीच रास्त मागणी दोंडाईचेकर नागरिक नगरपालीकेकडून ठेवत आहे.

Post a Comment

0 Comments