बीड : महामार्गाच्या कामात ठेकेदारांवर दबाव टाकून टक्केवारी मागणाऱ्या २२ आमदारांसह काही, खासदारांच्या विरोधात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली आहे. टक्केवारीच्या प्रकरणामुले रस्त्यांच्या कामाला विलंब होत असल्याने नितीन गडकरी चिडले आहेत. अनेकदा सांगूनही हे नेते न सुधारल्याने आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या या कारवाईच्या रोड रोरलखाली किती लोकप्रतिनिधी तुडवले जाणार, याची उत्सुकता आहे.
शासकीय निधीतून होणाऱ्या कामांत लोकप्रतिनिधी आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्याकडून ठेकेदारावर दबाव टाकून टक्केवारी मागणे आणि विशेषत: स्वत:च्या मतदारसंघात मंजूर करुन आणलेली कामे ठेकेदाराला देण्यासाठी टक्केवारी घेतल्याचा आरोप आणि चर्चा नियमीत होत असतात.
देशात हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारल्याने वाहतूक व्यवस्था सुधारली आहे. रस्त्यांमुळे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्याकडेही गडकरी यांचा कायम कटाक्ष असतो. राज्यातील लोकप्रतिनिधींना विकासापेक्षा टक्केवारीत अधिक रस आहे. मात्र, हीच गोष्ट गडकरींना पसंत पडली नाही. राज्यातील विविध भागात केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या निधीतून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामात ठेकेदारावर दबाव टाकून टक्केवारी मागण्याचे प्रकार घडले आहेत.
गडकरींनी अनेक वेळा भाषणातून असले घाणेरडे प्रकार टाळण्याचे आवाहन करुनही काही लालची लोकप्रतिनिधींना मोह आवरला नाही. त्यामुळे नितीन गडकरी यांनी मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील ठेकेदाराला टक्केवारी मागणाऱ्या २२ आमदारांसह काही खासदारांची यादीच सीबीआयला सादर केली आहे. याची चौकशी करुन कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, या यादीत बीडच्याही एका लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याची खात्रीशिर माहीती आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. एका प्रकरणातील धुराळा आताच शांत झालेला असताना आता हे दुसरे कोण अशी चर्चा रंगली आहे.
1 Comments
Very nice news
ReplyDelete