धुळे : तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेला सुमारे 28 लाखांचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. चालक मुस्तकीम शेख राजू (33, साक्री रोड, मोतीनाला, मोगलाई, धुळे) व जुल्फेखार शेख नूर मोहम्मद (34, रा.महात्मा फुले चौक, नेर, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
सोनगीर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक प्रकाश पाटील यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री नाकाबंदी लावण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार शामराव अहिरे, हवालदार अजय सोनवणे, हवालदार संदेसिंग चव्हाण, नाईक संजय जाधव, नाईक शिरीष भदाणे, कॉन्स्टेबल अतुल निकम यांच्या पथकाने केली.
Copy

0 Comments