शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी आपल्या हद्दीतील हिवरखेडा शिवारात सुरु असलेला बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त करून मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली होती व सदरचे शिवारात अवैध बनावट दारू कारखाना सुरू आहे .सदर माहितीच्या अनुषंगाने माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता हिवरखेडा गावाच्या शिवारातील शेतातील एका घरात दारू बनवण्याचे साहित्य कब्जात वाढवून काही इसम लोकांच्या आरोग्यास अपायकारक अशी बनावट चोरटी दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी छापा टाकून बनावट दारू बनवण्याचे साहित्य ,रसायन जप्त करण्यात आले असून राजेश गीलदार बर्डे वय 23 रा. जोगवाडा तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश ,धर्मेंद्र कैलास चंद पूरभिया वय 23 रा. ढु ढलाय तालुका जलालपूर जिल्हा शाजापूर मध्य प्रदेश ,देवेंद्र मोतीलाल मालवी वय 19 रा. बेरागड खुमान तालुका शामपूर जिल्हा सिहोरम मध्य प्रदेश ,योगेश बाबूलाल मालवी वय 22 रा . जिकडाखेडा तालुका बागली जिल्हा देवास मध्य प्रदेश हे चार आरोपी आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकूण 19 लाख 26 ,500 रुपये किमतीचे बनावट दारू बनवण्यात कमी लागणारे साहित्य, स्पिरिट, रसायनांचे ड्रम, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, दारूच्या बाटल्या ,बनावट बुच, विविध कंपनीचे लेबल, होलोग्राम, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे सदर आरोपींच्या विरोधात तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो, धुळे ,उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर अनिल माने सो यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट, पीएसआय नरेंद्र खैरनार, कॉन्स्टेबल महेंद्र वानखडे ,नियाज शेख, हेमंत पाटील, राजेंद्र मांडगे ,धनगर, संजीव जाधव, पवन गवळी, कुंदन पवार, इसरार फारुकी ,महिला कॉन्स्टेबल सुनीता पवार, अश्विनी चौधरी इत्यादींच्या पथकाने केली आहे.

0 Comments