जळगाव प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात एक लहान विमान दुर्घटना ग्रस्त झाले असून या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची तर महिला पायलट गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.
चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात असलेला हा भाग आदिवासी परिसर असून सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात सदरची दुर्घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. दुर्घटना झालेले हे छोटे हेलिकॅप्टर आहे छोटे विमान याबाबत कयास लावले जात असून हे छोटे विमान असून ते शिरपूर एअरपोर्ट चे असल्याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे .
सदरचे विमान प्रशिक्षणार्थींची विमान असावे असा देखील अंदाज व्यक्त केला जात असून याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सदरच्या परिसर आदिवासी असल्याने येथे आदिवासी बांधवांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून तहसीलदार चोपडा हे घटनास्थळी मी रवाना झाले आहेत. घटनास्थळ हे घनदाट जंगलाचा परिसर असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाने देखील मदत कार्यासाठी तारांबळ उडत असून तात्काळ मदत कार्य सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.



0 Comments