महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.. विशेषतः कोकणातील सर्व जिल्हे, तसेच कोल्हापूरला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.. नद्यांना पूर आलेले आहेत.. पत्रकारांना मात्र घरात थांबण्याची मुभा नाही.. पत्रकारांना रस्त्यावर उतरून रिपोर्टिंग करावे लागते .. हे करताना पत्रकार मित्र आणि कॅमेरामन यांनी स्वतः ची काळजी घेतली पाहिजे .. सबसे पहले आपली बातमी लागावी असे सगळ्यांनाच वाटत असते मात्र सबसे पहले च्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष होता कामा नये.. आपल्याबाबतीत काही घडले तर आपले मॅनेजमेंट आपल्या बरोबर नाही याची खुणगाठ मनासी बांधूनच किती धोका पत्करायचे ते ठरवले पाहिजे.. एवढंच सांगणं आहे..
आपण काळजी घ्याल ही अपेक्षा
*एस.एम.देशमुख*

2 Comments
बरोबर आहे साहेब
ReplyDeleteबरोबर आहे,सर
ReplyDelete