Header Ads Widget

शिंदखेडा तालुक्यातील वीज महावितरण विभागाचा "अंधेर नगरी चौपट राजा " कारभार उधळणार....... चिराग माळी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिंदखेडा




शिंदखेडा सह मेथी परिसरातील व अन्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विनावेळापत्रक होत असलेली लोडशेडींग तथा अनियमित होत असलेला विज पुरवठा हा अतिशय उच्च प्रतीचा अन्याय करणारा आहे.  शेतकर्‍यांच्या शेतातील डीपीच्या केबल जुन्या असल्याने त्या जीर्ण अवस्थेत असल्याने विद्युत वाहक तार मोकळे आहेत रात्री अपरात्री पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी मरण हातात घेऊन काम करत आहेत,  वायरमन शेतकरी वर्गाकडून पैसे उकळून त्यातून पार्टी करण्यात व्यस्त असल्याने हवालदिल झालेला शेतकरी जेव्हा सहाय्यक अभियंता पाडवी यांना कैफियत मांडतात तेव्हा ते वायरमन ला  संपर्क साधा असा सरळ हात झटकून मोकळे होतात,  आणि या सर्व चोरांचे सरदार असलेले विज वितरणाचे कार्यकारी अभियंता जोशी यांचा अधम कारभार म्हणजे जनतेचा पैसा पगाराच्या माध्यमातून फुकट खात आहे अशा या अंधेर नगरी चौपट राजा कारभारामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिंदखेडा दोन दिवसांचा कालावधी विज वितरण प्रशासनाला देत आहे त्यानंतर या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास सहाय्यक अभियंता पाडवी यांना दिसेल तिथे काळ फासून बैल जोडी सोबत मिरवणूक काढून निषेध करण्यात येईल तसेच कार्यकारी अभियंता श्रीमान जोशी यांच्या दालनातील वस्तुव्यवस्था शाबूत ठेवण्याची जबाबदारी त्यांची स्वतःची असेल दोन दिवस विज वितरण प्रशासनाला निर्वाणीची काळजी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी म्हणून आम्ही देत आहोत आणि मेथी शिवारातील होत असलेला अनियमित विज पुरवठा हा काय असेल त्या तांत्रिक त्रुटी दूर करून कायमस्वरूपी विज पुरवठा सुकर व सुरळीत करण्यात यावा ।

Post a Comment

0 Comments