धुळे : शहरापासून गेलेल्या सुरत बायपास मार्गावर गांजाची तस्करी करणारी कार पोलिसांनी पकडली असून, कारमधून १८ किलो गांजा जप्त केला आहे.
शहरापासून जवळच असलेल्या धुळे- सुरत बायपास रोडवर पांढऱ्या रंगाच्या कारमधून गांजाची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. या वाहतुकीबाबतची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून धुळे शहर पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक घटनास्थळी तैनात केले. यावेळी सुरत बायपास रोडवर सापळा रचून असलेल्या पोलिसांना माहिती मिळालेली कार आढळून आली.
कारमध्ये सापडला १८ किलो गांजा
कारला तात्काळ थांबून यामधील दोघा इसमांना ताब्यात घेत संपूर्ण कारची तपासणी केली. त्यामध्ये गांज्याने भरलेल्या गोण्या पोलिसांना आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दोघांच्या मुसक्या आवळल्या असून तब्बल १८ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान तब्बल सहा लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
0 Comments