धुळे, 16 ऑगस्ट (हिं.स.) गावच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणार्या १४ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीत ५ लाख ३४ हजाराचा अपहार केल्या प्रकरणी चिमठाणे ता.शिंदखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच खंडु भिल आणि तत्कालीन ग्राम विकास अधिकारी महेंद्र महिरे या दोघांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील क्रांती स्मारकामुळे प्रसिध्द असलेल्या चिमठाणे गावात ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा अपहार झाल्याचे शासकीय चौकशीतून स्पष्ट झाल्याने शिंदखेडा पंचायत समितीचे अधिकारी भिमराव गरुड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भिल व महिरे या दोघांनी सन २०१७-१८ च्या ग्रामनिधी मधून २९ हजार ५१० रुपये, १४ वा वित्त आयोग २०१७- १८ मधील ४७ हजार ९०० रुपये आणि सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या १४ वा वित्त आयोग मधून प्राप्त शासकीय अनुदानाची रक्कम ४ लाख ५६ हजार ९३६ रुपये असे एकुण ५ लाख ३४ हजार ३४६ रुपयांचा एकुण निधी वेळोवेळी वैयक्तीक फायदा करीत संगनमताने विविध विकास कामांसाठी खर्च केल्याचे दाखवून प्रत्यक्षात परस्पर शासकीय रकमेचा अपहार केला.
0 Comments