नरडाणा---कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व एन. एस. एस. स्वातंत्र्य अमृत महोत्सव या कार्यक्रमा निमित्त दि.20/08/21रोजी नरडाणा महाविद्यालयात सदभावना दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमसाठी नरडाणा पोलीस स्टेशन चे ए.पी. आय सन्मानीय मनोज ठाकरे सर उपस्थित होते. यांनी सदभावना दिवस निमित्त मानवतावादी दृष्टीकोन हा समाजासाठी अमूल्य ठेवा आहे असं सांगून यू. पी एस सी. एम. पी एस सी. परीक्षा विषयी मार्गदर्शन करून खेडेगावाचे विध्यार्थी हे विविध पोस्ट विषयी जाणत नाही तरी त्यांनी त्याचा शोध घेऊन तशी तयारी करावी याने नवपिढी निर्माण होईल. समोर एक ध्येय असावे. ही परीक्षा साचेबद्ध असते तसा अभ्यास करावा. ग्रंथालय निर्माण करावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास अध्यक्ष संजयकुमार सिसोदे, आदरणीय संचालिका सौ. संजीवनी सिसोदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील सर यांनी केले सर्व प्राध्यापक वृंद व नरडाणा पोलीस स्टेशन चे पोलीस हेडकांस्टेबल सचिन सोनवणे, अशोक पाटील उपस्थित होते. एन. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे, सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी यशस्वी नियोजन केले.

0 Comments