धुळे- वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, राष्ट्रपती असा प्रवास असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर जयंती दिवस राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेते बांधव वाचकांच्या दारापर्यंत वृत्तपत्र पोहचवून वाचकांची भूक भागवित असतांना कृतज्ञेपोटी आज काही ठिकाणी वाचकांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार केला.
धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, जेलरोड येथे सरोदे न्युज एजन्सीवर आपल्या वडीलांना पहाटेपासून रोज चार-पाच तास वृत्तपत्र विक्रीसाठी मदत करणारी ॲडव्होकेट कु. काजल हेमंत सरोदे व साक्री रोडवरील यशवंत नगर, कुमारनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून आझादनगर येथून रोज पाच कि.मी. तीन चाकी सायकलने प्रवास करून रोडवर स्टॉल लावून वृत्तपत्र विकणारे अपंग बांधव अख्तर उस्मान पठाण यांचा कृतज्ञता म्हणून सत्कार करून ऋण व्यक्त करतांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे व सामाजिक कार्यकर्ते बापूजी अहिरे.


0 Comments